सोलापूर- विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महागड्या स्पोर्ट्स सायकली चोरी करणाऱ्या संशयीत चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. सनी मल्लू पुजारी ( वय 25 वर्षे, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं-1 सोलापूर), असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. त्याच्याकडून 1 लाख 20 हजारांच्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी दिली.
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महागड्या सायकलींची चोरी होत होती. त्या अनुषंगाने तपास करताना गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली, मोटार सायकल व सायकल चोरी करणारी एक व्यक्ती इंदिरागांधी नगर येथील पोस्ट ऑफीसजवळ येणार आहे. याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे व डी.बी. पथकाने सापळा लावला. सनी मल्लू पुजारी यास अटक केले.