सोलापूर - माजी खासदार किरीट सोमैया आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर शहर आणि सांगोला येथे भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. सोलापूर शहरात असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पवार कुटुंबायांवर मोठे आरोप केले आहेत. अजित पवारांच्या बहिणी जरंडेश्वर साखर कारखान्यात भागीदार आहेत. याबाबतचे पुरावे मी ईडीला पाठवणार आहे. आणि शरद पवार यांनी हे खोटं आहे असे सिद्ध करून दाखवावं, असे आव्हान किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केले.
किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत पवार कुटुंबीयांना सवाल केला आहे की, अजित पवार व शरद पवार बोलतात की, माझ्या बहिणीचा काहीही संबंध नाही. संबंध नसताना ईडी चौकशी करत आहेत. मात्र अजित पवारांच्या बहिणी आणि त्यांचे मेहुणे जरंडेश्वर कारखान्यात पार्टनर आहेत. पवार कुटुंब कुणाशी बेईमानी करत आहे? ही बेईमानी बहिणीशी की महाराष्ट्र राज्यातील जनतेशी, असा सवाल किरीट सोमैयांनी उपस्थित केला.
शरद पवारांना किरीट सोमैया यांचे खुले आव्हान -