महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मटका किंग नगरसेवकाचा तीन वर्षांत जुगारातून 307 कोटींचा व्यवसाय; सोलापुरात उभारले साम्राज्य - solapur betting news

सोलापुरात भाजपाच्या मटका किंग नगरसेवकाने जुगाराच्या माध्यमातून शेकडो कोटींचा व्यवसाय केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे.

सोलापूर गुन्हे शाखा
मटका किंग नगरसेवकाचा तीन वर्षांत 307 कोटींचा व्यवसाय; सोलापुरात उभारले साम्राज्य

By

Published : Sep 24, 2020, 7:37 AM IST

सोलापूर - मटका किंग व भाजपाचा नगरसेवक सुनील कामाठी याने जुलै 2017 ते ऑगस्ट 2020 या तीन वर्षांच्या कालावधीत 307 कोटींचा अवैध व्यवसाय केल्याची माहिती क्राइम ब्राँचने दिली आहे. या व्यवसायात त्याची पत्नी सुनीता कामाठीला देखील सहआरोपी म्हणून अटक झाली आहे. तसेच या मटका व्यवसायात मदत करणारा हुसेन उर्फ रफिक नूरअहमद तोनशाळ, प्रवीण भीमाशंकर गुजले यांना देखील सोलापूर क्राइम ब्राँचने ताब्यात घेतले आहे.

सुनील कामाठी याने सोलापुरातील गोरगरीब जनतेला अमिष दाखवून ऑनलाइन मटका बुकीमधून 307 कोटींचा अवैध व्यवसाय केल्याचे तपासात उघड झाले. नगरसेवक पदाचा दुरुपयोग करून कामाठीने हे साम्राज्य उभारल्याचा ठपका त्यावर ठेवण्यात आलाय. सन 2017 ते 2020 या तीन वर्षांच्या कालावधीत त्याने अवैध मटका आणि अन्य जुगाराच्या माध्यमातून भागीदार, लाईनमन व एजंट यांच्या तर्फे 307 कोटींचा व्यवसाय केला.

24 ऑगस्टला सुनील कामाठी याच्या मटक्या अड्ड्यावर झालेल्या कारवाई नंतर तो फरार होता. पोलिसांनी कसून तपास करत त्याची सर्व माहिती बाहेर काढली. गुन्हा दाखल झाल्यापासून तो प्रवीण भिमाशंकर गुजले याच्या मालकीच्या चारचाकीतून सतत ठिकाणं बदलत फिरत होता. गुलबर्गा, रायचूर(कर्नाटक) व विजयवाडा, मच्छलीपटनम,हैदराबाद या ठिकाणी तो लपल्याची गुप्त माहिती समोर आली. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचत संंबंधित आरोपीला बुधवारी पहाटे हैदराबाद येथून अटक झाली आहे. सोलापुरातील जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details