सोलापूर - करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवरील लोखंडी स्लॅब कोसळल्याने 15 जण जखमी झाले आहेत. तर यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. स्लॅब कोसळला त्यावेळी बँकेत अनेक ग्राहक होते. आज (बुधवार) सकाळच्या दरम्यान अनेक खातेदार हे बँकेत आलेले होते. त्यामुळे बँकेत काहीशी गर्दी होती. त्याचवेळी अचानक पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. त्यामुळे जवळजवळ ३० हून अधिक जण हे ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
या दुर्घटनेत प्रशांत कैलास बागल (भोसरे, ता.माढा. कर्मचारी, प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय) यांचा मृत्यू झाला. तसेच त्यानंतर रात्री उशीरा लोचना गुंजाळ (75 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.तर 15 जण जखमी झाले आहेत.
प्रशांत बागल हे बँकेच्या कामासाठी करमाळ्याला आले होते. यावेळी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानकपणे पहिल्या मजल्यावरील लोखंडी अँगल व फरशीचा स्लॅब कोसळला.
- उपचारासाठी सोलापूरला पाठवलेले जखमी
- सुरज पवार
- अनिल वारे
- चंद्रकांत पवार
- लैला पवार
- सुनील काळे
- मंगल गरड
- नंदाबाई पवार
- सुभद्रा लकडे
- राजेंद्र भोसले