सोलापूर -अंगणवाडीत मुलांना स्वच्छ आणि ताजा आहार दिला जातो. मे महिन्यात दिला जाणारा आहार जुलै महिन्यात आला आहे आणि हा आहार कोरड्या स्वरूपात आला आहे. वेगवेगळ्या बचतगटांनी हा आहार शिजवून द्यावयाचा आहे. पण वाढत्या महागाई आणि गॅस दरवाढीमुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बचत गटांनी हातवर केले आहे. त्यामुळे अंगणवाडी प्रकल्पातील वरीष्ठ पर्यवेक्षिका या अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीत आहार शिजवून द्यावा, अशी सक्ती करत आहेत. पण यांना देखील वाढत्या महागाईचा जबर फटका बसत असून अंगणवाडीत आलेल्या लाभार्थ्यांना आहार शिजवून देणे अवघड झाले आहे. याचा विरोध करण्यासाठी अंगणवाडीच्या शेकडो सेविकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
गॅस दरवाढीचा अंगणवाड्यांवर दुष्परिणाम; मुलांना आहार शिजवून देणे झाले अवघड - सोलापूर अंगनवाडी सेविका बातमी
अंगणवाडी सेविकांना दिलेले पोषण ट्रॅक अॅप हे इंग्रजी भाषेत आहे. बहुतांशी अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही.मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे.आणि महाराष्ट्र राज्यात सर्व व्यवहार हे मराठी भाषेतून झाले पाहिजे असा कायदा असताना पोषण ट्रॅक अॅपमध्ये वजन,उंची,तसेच पोषण अभियानाची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची सक्ती केली जात आहे. या सर्व प्रमुख मागण्या घेत मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केले.
प्रति लाभार्थी फक्त 65 पैसे अनुदान -अंगणवाडीत येणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होते.प्रति लाभार्थी फक्त 65 पैसे मिळत असल्याने लाभार्थी मुलांना स्वच्छ आणि ताजे आहार शिजवून देणे अवघड झाले आहे.गॅस सिलेंडरची किंमत गगनाला भिडली आहे. अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकारी अंगणवाडी सेविका महिला कर्मचाऱ्यांना सक्ती करत आहेत. याच विरोध यावेळी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात आला.
पोषण ट्रॅक अॅप मराठीमधून असावा -अंगणवाडी सेविकांना दिलेले पोषण ट्रॅक अॅप हे इंग्रजी भाषेत आहे. बहुतांशी अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही.मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे.आणि महाराष्ट्र राज्यात सर्व व्यवहार हे मराठी भाषेतून झाले पाहिजे असा कायदा असताना पोषण ट्रॅक अॅपमध्ये वजन,उंची,तसेच पोषण अभियानाची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची सक्ती केली जात आहे. या सर्व प्रमुख मागण्या घेत मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केले.