सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात शनिवारी कोरोना विषाणूचा उद्रेक झाला आहे. सोलापूर शहरात 363 रुग्ण तर ग्रामीण भागात 714 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन विविध स्तरावर उपाययोजना करत आहे. मात्र, कोरोना विषाणूचे थैमान सुरूच आहे. विक-एन्ड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहर आणि जिल्ह्यात 1 हजार 77 रुग्णांची भर पडल्याने सोलापूरकर हादरले आहेत. कोरोना विषाणूच्या महामरीने मरायचे का लॉकडाऊनच्या उपासमारीमुळे मरायचे हा असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सोलापूर शहरी भागात शनिवारी 11 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 7 कोरोना रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.
सोलापुरात विक-एन्ड लॉकडाऊनला कोरोनाचा उद्रेक; 1077 रुग्णांची भर
सोलापूर शहरात विकेंड लॉकडाऊन दिवशी 1077 नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात 17 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.
सोलापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ -
सद्यस्थितीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कडक नियमावली 5 एप्रिलपासून सुरू आहे. ही नियमावली 30 एप्रिलपर्यंत लागू असणार आहे. दर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे. या सर्व नियमांची अंमलबजावणी करत असतानादेखील कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. शनिवारी विक-एन्ड लॉकडाऊनला सोलापूर शहरात 363 रुग्ण आढळले आहेत. सोलापूरच्या ग्रामीण भागात 714 रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहर आणि ग्रामीण भागात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.