महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गडकरींच्या अनुपस्थितीने 'लोकयात्री'चा प्रकाशन सोहळा राहिला अर्ध्यावर

विद्यापीठाच्या व्यासपीठावर गडकरीना भोवळ आल्याचा प्रसंग गुदरल्यानंतर त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द झाले. यामुळे हुतात्मा स्मृती मंदिरातील लोकयात्रीच्या प्रकाशन सोहळ्याचा उत्साह मावळला. लोक सभागृहातून निघून जाऊ लागले. त्यावेळी या घाई गर्दीतही आयोजकांनी थेट लोकांच्या हाती पुस्तक देत प्रकाशन आणि लोकार्पण उरकले.

By

Published : Aug 2, 2019, 7:52 AM IST

गडकरींच्या अनुपस्थितीने लोकयात्रीच्या प्रकाशनाचा सोहळा राहिला अर्ध्यावर राहिला

सोलापूर -केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात भोवळ आली होती. त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरील लोकयात्री पुस्तकाचा नियोजित प्रकाशन सोहळा मान्यवरांविनाचा पार पडला. मात्र, हा क्रार्यक्रम पुन्हा एकदा होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.

गडकरींच्या अनुपस्थितीने लोकयात्रीच्या प्रकाशनाचा सोहळा राहिला अर्ध्यावर राहिला

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्यावतीने सुभाष देशमुख यांच्या जीवनावरील लोकयात्री या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मात्र, ऐनवेळी विद्यापीठाच्या व्यासपीठावर भोवळ आल्याचा प्रसंगामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द झाले. यामुळे हुतात्मा स्मृती मंदिरातील लोकयात्रीच्या प्रकाशन सोहळ्याचा उत्साह मावळला. नागरिक सभागृहातून निघून जाऊ लागले. त्यावेळी या घाई गर्दीतही आयोजकांनी थेट लोकांच्या हाती पुस्तक देत प्रकाशन आणि लोकार्पण उरकले.

निरुपणकार विवेक घळसासी यांनी गडकरी यांच्या भावना लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत लोकांनी सभागृह सोडले होते. यामुळे आयोजकांचा नाईलाज झाला अन कार्यक्रम संपवला. अशा रितीने मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशनाचा लोकायात्रीचा प्रवास अर्ध्यावर राहिला.

ABOUT THE AUTHOR

...view details