पुणे- शहरातील लोहगाव परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने ६ महिन्यात तब्बल १२ अल्पवयीन मुलींचे लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विक्रम पोतदार असे या नराधम शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जि.प शाळेत शिक्षकाने ६ महिन्यात तब्बल १२ मुलींवर केले लैंगिक अत्याचार - पुणे
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने ६ महिन्यात तब्बल १२ अल्पवयीन मुलींचे लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विक्रम पोतदार असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे.
मागील ६ महिन्याच्या कालावधीत शाळेच्या मधल्या सुट्टीत मुलींना एका खोलीत घेऊन दम देत कोणाला काही सांगायचे नाही, असे सांगून शिक्षक लैंगिक अत्याचार करत होता. शिक्षकाने तब्बल १२ मुलींवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी शाळेतील इतर मुलींकडेही चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाने कारवाईला करताना लैंगिक शोषण प्रकरणी शिक्षक विक्रम पोतदारला निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. तसेच शाळेने माहिती लपवली म्हणून त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही तयार केला असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम पोतदार असे या नराधम शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.