पुणे - शहरात इतिहासाचा वारसा जपत आजही अनेक गोष्टी या वेग वेगळ्या साक्ष देतात. तसा पाहता शहराचा इतिहासाचा वारसा फार मोठा आणि जुना आहे . या शहराने इतिहासातील अनेक गोष्टी आपल्या मनात साठवून ठेवल्या आहेत. याच पुण्यात एक असा दगड आहे ज्याला शून्य मैलाचा दगड आहे. हाच शून्य मैलाचा दगड पुणे शहराचा भौगोलिक केंद्रबिंदू आहे.
पुणे शहरातील शून्य मैलाचा दगड, इथून तुम्हाला मोजता येत पुण्यापासूनच जगातील कुठल्याही ठिकाणचं अंतर पुण्यातील शून्य मैलाचा दगड -शून्य मैलाचा दगड म्हणजे पुणे शहराचा भौगोलिक केंद्रबिंदू होय. शहराचे प्रत्येक ठिकाणचे अचूक अंतर मोजण्याच काम हा दगड करतो. इसवी म १८७२-७३ साली ब्रिटिश राजवटी अंतर्गत या दगडाची स्थापना पुण्यातील सरकारी पोस्ट ऑफीस समोर करण्यात आली होती . ब्रिटिशांनी अत्यंत महत्वाकांक्षी अशा त्रिकोणमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचा एक भाग म्हणून एकूण ८० शून्य मैलाचे दगड शहरांमध्ये स्थापन केले होते. ब्रिटिशांनी केलेल्या या सर्वेक्षणा झाली शून्य मैलाच्या दगडाची निर्मिती -ब्रिटिशांनी इसवीसन १८ मध्ये चालू झालेले हे सर्वेक्षण जगातील सर्वांत मोठे भौगोलिक सर्वेक्षण मानले आहे. ज्यामध्ये कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत आणि मुंबई पासून ते ईशान्य भारताच्या पश्चिम किनारपट्टी पर्यंतचा भूभाग व्यापला गेला आहे. सर्वेक्षण पूर्ण करण्यास ५०-६० वर्षाचा कालावधी -देशातील भूभागाची समुद्रसपाटीपासूनची उंची, भौगोलिक रचना, नद्या-नाले, शहरे यांची अत्यंत अचूक आणि शास्त्रीय माहिती देणारे सर्वेक्षण पूर्ण करण्यास ५०-६० वर्षाचा कालावधी लागला होता. भौगोलिक सर्वेक्षणाच्या बरोबरीने खगोलीय सर्वेक्षण करून असंख्य गणितीय समीकरणे व अचूक माहितीची नोंद यावेळी करण्यात आली. एकूण ९२३० गणितीय समीकरणाचा वापर -असे म्हटले जाते की नकाशात नोंदवलेल्या प्रत्येक जागेची समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्याकरिता कमीत कमी २०० गोलीय निरीक्षणे केली गेली. व संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याकरिता एकूण ९२३० गणितीय समीकरणाचा वापर केला गेला. तसेच या सपूर्ण सर्वेक्षण भारताचा भूभाग पायी पिंजून काढून करण्यात आले. यावरूनच या प्रकल्पाच्या क्लिष्टतेचा आणि व्यापकतेचा अंदाज येतो.