महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 31, 2021, 3:56 PM IST

ETV Bharat / city

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने नैराश्यातून तरुणाने संपविले जीवन

लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद पडून नोकरी गेल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा येथील कावेरी पार्क सोसायटीत मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने नैराश्यातून तरुणाने संपविले जीवन
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने नैराश्यातून तरुणाने संपविले जीवन

पुणे : लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद पडून नोकरी गेल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा येथील कावेरी पार्क सोसायटीत मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. ऋषीकेश मारुती उमाप(वय 29) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील कावेरी पार्क सोसायटीत ऋषीकेश आई-वडिलांसोबत राहत होता. सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे झोपला होता. परंतु सकाळ झाली तरीही तो त्याच्या रूममधून बाहेर न आल्यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा वाजवला. परंतु दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला असता गळफास घेतलेल्या अवस्थेत ऋषीकेश निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ऋषीकेश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. परंतु नुकत्याच झालेल्या लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद पडली आणि तो बेरोजगार झाला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. तसेच तो गेल्या काही दिवसांपासून रात्र-रात्र पबजी गेम खेळत असल्याचेही घरच्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा कयास पोलिसांनी वर्तविला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details