पुणे -पुणे शहराच्या उपनगर भागांमध्ये येरवडा कारागृह आहे. ब्रिटिशांनी 1871 साली हे कारागृह बांधले होते. या कारागृहाला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांना या कारागृहात ठेवले गेले होते. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक आदींचा समावेश होतो. ब्रिटिशांविरोधात यांनी आवाज उठवल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवले जात असे.
पुणे करार -
इतिहासातील महत्वाची नोंद असलेला पुणे करार हा महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. तो देखील 24 सप्टेंबर 1932 साली येरवडा कारागृहात झाला होता. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य विषय होता. ब्रिटीश सरकारने जातीय निवाडा घोषित केल्यामुळे गांधीजींनी आमरण उपोषणास सुरुवात केली. महात्मा गांधी यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची मनधरणी केली. सदर पुणे करारावर गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यावर गांधीजींनी हे उपोषण मागे घेतले. या करारवर पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार" किंवा "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.
स्वातंत्र्यलढा ते स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचा साक्षीदार येरवडा कारागृह
पुणे शहराच्या उपनगर भागांमध्ये येरवडा कारागृह आहे. ब्रिटिशांनी 1871 साली हे कारागृह बांधले होते. या कारागृहाला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांना या कारागृहात ठेवले गेले होते. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक आदींचा समावेश होतो. ब्रिटिशांविरोधात आवाज उठवल्यामुळे भारतीय नेत्यांना तुरुंगात ठेवले जात असे.
ब्रिटीश काळापासून मोठे कारागृह, कसाबलाही येथेच फाशी -
येरवडा हे ब्रिटिश काळापासून ते आजतागायत कैद्यांसाठी मोठे कारागृह म्हणून ओळखले जाते. पाचशे एकरांपेक्षा अधिक परिसरामध्ये हे कारागृह विस्तारित असून पाच हजार कैद्यांची क्षमता या कारागृहात आहे. या कारागृहांमध्ये खुले कारागृह, अत्याधुनिक अंडा सेलपासून विविध गोष्टींचा समावेश होतो. येथे कैद्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. अजमल कसाब या दहशतवाद्याला देखील या कारागृहामध्ये फाशी दिली गेली होती.
खुले कारागृह -
येरवडा खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ज्या कैद्यांनी शिक्षेची पाच वर्षे पूर्ण केली आहेत आणि त्यांनी शिक्षेच्या कालावधीमध्ये चांगले वर्तन दाखवले आहे, त्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवतात. खुल्या कारागृहात कैद्यांना कारागृहाच्या खोल्यांमध्ये ठेवले जात नाही.
खुल्या कारागृहातील कैदी सदर उपलब्ध जागेत शेती करतात. याशिवाय येथे गोठा आहे. खुल्या कारागृहात विविध फळभाज्या, पालेभाज्या, भात, हरभरा इ.ची लागवड केली जाते. येरवडा कारागृहामध्ये कैदी असणाऱ्या कैद्यांसाठी रेडिओ स्टेशन चालवले जाते. तसेच कैद्यांच्या हाताला रोजगार मिळावे म्हणून देखील विविध उपक्रम देखील राबवले जातात.