महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, 7 जणांवर गुन्हा - live marathi news

दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाणाच्या हद्दीत बोरीऐंदी येथे झाडाखाली बसून तीन पत्ती हा जुगार खेळणाऱ्या ७ जणांवर यवत पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांची कारवाई
पोलिसांची कारवाई

By

Published : May 29, 2021, 8:41 PM IST

पुणे -दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाणाच्या हद्दीत बोरीऐंदी येथे झाडाखाली बसून तीन पत्ती हा जुगार खेळणाऱ्या ७ जणांवर यवत पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम १७९० रुपये जप्त करण्यात आले आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.

जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना माहिती मिळाली होती की बोरीऐंदी येथे काही लोक तीन पत्ती नावाचा जुगार खेळत आहेत. यानुसार त्यांनी पोलीस पथकास सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन गाडी अलीकडे लावून खात्री केली, त्यावेळी झाडाखाली काही लोक गोलाकार करून हातात पत्ते घेऊन बसलेले दिसले. यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून सर्वांना ताब्यात घेतले.

जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल
यात पोलिसांना विलास उर्फ पिंटू गेनबा पवार, गणेश नामदेव थोरात, सुभाष बबन दौंडकर, चंद्रकांत मारती गिरी, गोविंद अर्जुन गायकवाड, नवनाथ भगवान थोरात, रविंद्र राजाराम गायकवाड सर्व राहणार बोरीऐंदी ता.दौंड जि.पुणे यांच्याकडून पत्ते व रोख रक्कम १७९० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सर्व आरोपींवर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल नारायण जाधव, पोलीस हवालदार एसएस बगाडे, पोलीस नामदार दशरथ बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल डी. टी. होळकर, पोलीस कॉन्स्टेबल एस.डी.नगरे यांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या - छगन भुजबळ

ABOUT THE AUTHOR

...view details