पुणे - काल तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मुंबई ( KCR Maharashtra Visit ) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( KCR Visit CM Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली. आगामी 2024च्या निवडणुकीसाठी ही भेट महत्त्वाची मानली जात असून तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावर महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur Reaction On KCR Uddhav Thackeray Meeting ) यांना विचारलं असता, 'आज संघी विरोधात जे वातावरण निर्माण झालं आहे, ते काँग्रेसमुळेच तयार झाला आहे, त्यामुळे काँग्रेस शिवाय तिसरी ( Third Front Without Congress ) आघाडी शक्य नाही', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ज्या तिसरी आघाडीबाबत चर्चा सुरू आहे, ती आघाडी काँग्रेस विरहित झाली, तर ती बळकटीपासून दूर राहील. काँग्रेस शिवाय ही आघाडी होऊच शकत नाही, असेही त्यांना म्हणाल्या.
'लडकी हूं लड सकती हूं' -
'लडकी हूं लड सकती हूं' या कार्यक्रमास १२५ दीवस पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्यावतीने महिला रॅलीचे आयोजन पुण्यातील गुडलक येथे करण्यात आल होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी दिलेला नारा 'लडकी हूं लड सकती हूं', स्त्री शक्ती स्त्री सन्मान पूर्ण भारत देशातील मुली आणि स्त्रिया आपल्या अधिकारासाठी लढू शकतात, हा संदेश या घोषणेतून त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होत्या.