महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 4, 2019, 8:12 PM IST

ETV Bharat / city

ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीच्या जन्मोत्सवानिमित्त कुस्तीची दंगल

ओझरच्या विघ्नेश्वपराच्या जन्मोत्सवानिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती दंगलीत २५० मल्लांनी सहभाग घेतला.

ओझरच्या विघ्नेश्वपराच्या जन्मोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल

पुणे -अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीचा पाच दिवसांचा जन्मोस्तव सुरु आहे. यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील २५० मल्लांनी या दंगलीत सहभाग घेतला. विशेष म्हणजे मुलींनी सुद्धा या कुस्तीच्या दंगलीत सहभाग घेतला होता.

हेही वाचा - गणेशोत्सवाला पावसाचा फटका; मंडपामध्ये शिरले पाणी

या दंगलीत ६६,६६६ रुपयांचा आखाड्याचा लिलाव मुरलीधर घेगडे, रघुनाथ मांडे यांनी घेतला, २२,००० रुपयांचा पागोट्यांचा लिलाव दत्तात्रय कवडे, चिंतामण जाधव आणि २१००० रुपयांचा पानसुपारीचा लिलाव सुरेश कवडे यांनी घेतला. गणेशोत्सव काळात संपूर्ण ओझर नगरीत भक्तीमय वातावरण पहायला मिळत आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुका जवळ आल्याने तालुक्यातील सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी या कुस्तीच्या दंगलीच्या आखाड्याला भेट दिली. काही कुस्त्या या मंडळींच्या हस्ते लावण्यात आल्या.

हेही वाचा - 'राणादा'ने ठाणे सार्वजनिक गणेशोत्सवात केली बाप्पाची आरती

ABOUT THE AUTHOR

...view details