पुणे -येरवडा येथील शास्त्रीनगर येथील गल्ली क्रमांक ८ येथील एका इमारतीचा लोखंडी सांगाडा ( Iron Skeleton of The Building Collapsed ) बांधण्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळला. यात ५ जणांचा मृत्यू झाला ( 5 People Died ) आहे. तर पाच जणांवर उपचार सुरू आहे. नेमकी ही घटना कोणत्या कारणामुळे घडली. याबाबत घटनास्थळावर उपस्थित सुपरवायझरने माहिती दिली आहे. लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरु असतांना तिथेच जेसीबीने काम सुरु होते. याच जेसीबीचा धक्का लोखंडी सांगाड्याला लागून ही दुर्घटना घडल्याची शक्यता उपस्थित कामगाराने वर्तविली आहे.
Pune Building Collapse : जेसीबीच्या धक्क्यामुळे दुर्घटना घडली असावी; कामगाराची माहिती - या कारणामुळे घडली पुणे दुर्घटना
एका इमारतीचा लोखंडी सांगाडा ( Iron Skeleton of The Building Collapsed ) बांधण्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळला. यात ५ जणांचा मृत्यू झाला ( 5 People Died ) आहे. तर पाच जणांवर उपचार सुरू आहे.
तीन दिवसांपूर्वी सांगाडा टाकण्याचे काम सुरू होते. त्यावर वेल्डिंग करून ती घट्ट केली जात आणि त्यानंतर त्यावर काम केले जाते. चार वाजल्याच्या सुमारास जेसेबीच्या माध्यमातून या जाळीसमोरील दगड काढण्याचे काम सुरू होत. तेव्हा जेसीबीचा धक्का या जाळीला बसला आणि त्यामुळेच ही घटना घडली असावी, अशी माहिती सुपरवायझर मूनव्वर आलम यांनी दिली आहे. शिवाय आम्ही 30 ते 35 जण काम करत होतो. अचानक ही घटना घडली आणि जाळीच्या खाली असलेल्या 5 जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे काम अलु वालिया नामक बिल्डरच्या मालकीचे असल्याची माहिती आहे.
हेही वाचा -Building Collapse Pune : पुण्यातील येरवड्यात इमारत कोसळली; 5 जणांचा मृत्यू