पुणे :पुण्याची जशी सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे. तशी आता मेट्रो सिटी म्हणून सुद्धा ओळख होणार आहे. यामध्ये विशेष अशी भुयारी मेट्रो पुण्यामध्ये तयार होते आहे. या भुयारी मेट्रोचे काम आता प्रगतीपथावर आलेले आहे. शिवाजीनगर आणि सिविल कोड असे मेट्रोचे दोन स्टेशन्स आहेत. ज्यामध्ये सहा किलोमीटरचे टप्पे आहेत. एकूण बारा किलोमीटरची ही मेट्रो ( UInderground Metro pune )आहे. त्यामध्ये सिविल कोर्स स्टेशन, हेज स्टेशन आहे. ते अत्याधुनिक असणार आहे.
Special Report Pune Metro : पुण्याची नवीन ओळख ठरणारी भुयारी मेट्रो, ३० मीटर खोलीवर असणार स्टेशन - UInderground Metro pune
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे .विशेष अशी भुयारी मेट्रो पुण्यामध्ये तयार होते आहे. स्वारगेट ते सिविल कोर्ट स्टेशन पर्यंतची मेट्रो आहे. ज्या मेट्रोमध्ये मंडई स्वारगेट कसबा पेठ , सिविल कोर्ट आणि शिवाजीनगर असे पाच स्टेशनची हे भुयारी मेट्रोचे काम आता प्रगतीपथावर ( Work Of UInderground Metro Is Now In Progress ) आलेले आहे.
एक ऐतिहासिक वास्तू तयार करण्याचा पुणे मेट्रोचा मानस- सिविल कोर्ट स्टेशनमध्ये ज्यावेळेस मेट्रो येईल त्यावेळेस प्रवाशांना पाच टप्पे वर चढून यावं लागेल, त्याच्यासाठी इलेव्हेटेड लेफ्टची सोय आणि शिड्याची सुद्धा सोय मेट्रो तर्फे करण्यात येणार आहे. एक मेट्रोचे स्वारगेटला येईल ती याच स्टेशन वरती क्रॉस होऊन परत जाईल तीच दुसरी पिंपरी चिंचवड वरूनमेट्रो येईल व ती सुद्धा याच ठिकाणी क्रॉस होऊन परत जाणार आहे. त्यामुळे हे स्टेशन एक टर्मिनस असणार आहे. तर भुयारामध्ये जवळपास 30 ते 28 मीटर खाली खोल एक मोठा ऐतिहासिक स्टेशन होणार आहे. त्या ठिकाणी प्रवाशांसाठी कॅफेट एरिया असेल प्रवाशांसाठी लागणारा जो मोकळा फेस लागतो तो उपलब्ध करून देता येईल. रेल्वे मेट्रो तर्फे विविध ज्या सुविधा प्रवाशांना देणे अपेक्षित आहे. त्या सगळ्या सुविधांची व्यवस्था स्टेशनमध्ये असेल व एक ऐतिहासिक स्टेशन पुणेकरांसाठी असणार आहे. आणि पुण्याच्या इतिहासासाठी यांची नोंद होईल अशी अपेक्षा पुणेकराना आहे.
हेही वाचा :पुणे मेट्रोतर्फे नदीकाठचा खडतर भुयारी मार्ग पूर्ण.. टीबीएम मशिनने ओलांडले मुठा नदीपात्र