'वाह रे भाजपा तेरा खेल..उज्वला गॅस हो गया फेल' म्हणत महिला काँग्रेसचे केंद्राविरोधात बोंबाबोंब आंदोलन
उज्वला गॅस योजना ही फेल झाली असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची सबसिडी बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर या गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. आत्ता ही योजना फेल झाली असून वाह रे भाजपा तेरा खेल.. उज्वला गॅस हो गयी फेल म्हणत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने अलका चौकात केंद्र सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
Ujjawala gas Yojna
पुणे - केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेली उज्वला गॅस योजना ही फेल झाली असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची सबसिडी बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर या गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. आत्ता ही योजना फेल झाली असून वाह रे भाजपा तेरा खेल.. उज्वला गॅस हो गयी फेल म्हणत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने अलका चौकात केंद्र सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
आज मोठ्या प्रमाणात महागाईमध्ये वाढ झाली आहे. ज्या महिलांच्या मतांवर आज मोदी सरकार सत्तेत आले आहे. त्या महिलांसाठी उज्वला गॅस योजना आणण्यात आली. पण आज गॅसचे दर हे गगनाला भिडले आहेत. महिलांना घर चालवणे देखील मुश्किल झाले आहे. आज महिला काँग्रेसच्यावतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत असून आम्ही या आंदोलनाद्वारे मोदी सरकारला उज्वला गॅस सिलिंडर हा वाण म्हणून पाठविण्यात येणार आहे. असं यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी म्हटले आहे.
हेच का अच्छे दिन -
दिवसेंदिवस गॅसचे दर हे वाढतच चालले आहे. 2014 ला गॅसचे दर हे 400 रु होते ते आज 1 हजारच्या पूढे गेले आहे. आज अत्यावश्यक वस्तू यांच्या किंमतीत देखील वाढ होत चालली आहे. जे अच्छे दिनाचे स्वप्न या सरकारने दाखवले होते. ते हेच का अच्छे दिन, असा सवाल देखील यावेळी सव्वालाखे यांनी केला. यावेळी आंदोलनात महिलांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Last Updated : Jan 16, 2022, 5:01 PM IST