पुणे :अवघ्या तीन वर्षांच्या मुलीचे कोरेगाव पार्क पुणे येथून अपहरणकरण्यात आले होते. पोलिसांनी ताबडतोब चौकशी करून कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी सराईत महिलेला अटक केली आहे. तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केवळ भीक मागण्यासाठी आणि लग्नातून हुंडा मिळविण्याच्या उद्देशाने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. श्रीगोंदा येथे घेऊन जाणार्या सराईत महिलेला पोलिसांनी अटक केली असून, मुलीची सुखरूप सुटका केली.
विनायक वेताळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोरेगाव पार्क ठाणे असं झालं होतं अपहरण :एक 23 वर्षांची महिला ढोले पाटील रोडवर फुगे विकत असते. ती 23 मे रोजी दुपारी दीड वाजता एका रिक्षात झोपली होती. त्यावेळी तिच्या 3 वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले होते. तिने दोन दिवस तिचा शोध घेतल्यानंतर मुलगी मिळून येत नाही हे लक्षात आल्यानंतर 25 मे रोजी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.
पोलिसांकडून अपहरण केलेल्या मुलीची सुटका पोलिसांनी केली कसून चौकशी : तब्बल पाच दिवस 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे व हातातील पिशवीच्या नावावरून पोलिसांनी आरोपीला पकडलं. पोलिसांनी तत्काळ परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तब्बल पाच दिवस 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे व हातातील पिशवीच्या नावावरून पोलिसांनी तब्बल 5 दिवसांनी श्रीगोंदा येथून उषा नामदेव चव्हाण (वय 40, रा. कापसे वस्ती, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) हिला अटक केली.
पोलिसांकडून अपहरण केलेल्या मुलीची सुटका
हुंडा घेता यावा यासाठी केले अपहरण :आरोपी उषा चव्हाण हिला दोन मुले व दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून, लग्नात तिने 30 हजार रुपये हुंडा घेतला होता. त्यांचे समाजामध्ये मुलीचे लग्न करताना मुलाच्या वडिलांकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. या कारणासाठी ती लहान मुलीला पळवून नेऊन तिला भिक्षा मागण्यासाठी लावणे तसेच तिचे लग्न करताना हुंडा घेता यावा, यासाठी पळवून आणले होते, असं तिने सांगितले.
हेही वाचा : Pune Crime News : पुण्यात दिव्यांग अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन दारु पाजून केले अश्लिल कृत्य