पुणे - भारत परंपरेने अणि आधुनिकतेने नटलेला देश आहे. भारताने आधुनिकतेला विज्ञानाची साद घालत मोठी प्रगती केली. याच जोरावर भारताने जगात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यातच तंत्रज्ञानात देखील भारताने मोठे यश गाठल आहे. त्याच तंत्रज्ञानाचे जागर करण्याचा आजचा दिवस म्हणजे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. ( National Technology Day 2022 )
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यामागे रंजक इतिहास - देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मेला साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे. तसेच हा दिवस साजरा करण्यामागे एक रंजक इतिहास देखील आहे, असे नासा एज्युकेटर आणि खगोल शास्त्रज्ञ लीना बोकील यांनी असे सांगितले.
नासा एज्युकेटर आणि खगोल शास्त्रज्ञ लीना बोकील यांची प्रतिक्रिया राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस का साजरा करतात ? ( Why CelebratedNational Technology Day? ) -
११ मे १९९८ मध्ये भारताने ऑपरेशन शक्ती अंतर्गत राजस्थानच्या पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली. त्यानंतरच अण्वस्त्रे असलेल्या देशांच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट झाले. त्यानंतर १३ मे रोजी दोन विभक्त चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांचे नेतृत्व तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. यानंतर ११ मे १९९९ रोजी प्रथमच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या दिवसाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.
..म्हणून हा दिवस खास - तेव्हापासून आजपर्यंत तंत्रज्ञान विकास मंडळाने तांत्रिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल शास्त्रज्ञ व अभियंत्यांचा सन्मान व प्रोत्साहन केले जाते. या दिवशी डीआरडीओ, भाभा अणु संशोधन केंद्र आणि एएमडीईआर यांनी यशस्वीरीत्या चाचणी केली होती. हेच कारण होते. ज्यामुळे भारत थर्मोन्यूक्लियर शस्त्रे तयार करण्यास सक्षम बनू शकला आहे. तसेच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या दिवशी हंस-१ हे या पहिल्या भारतीय विमानाने यशस्वी भरारी घेतली होती. त्याशिवाय डीआरडीओने त्याच दिवशी त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीही केली होती. अशा अन्य साधारण गोष्टी भारताच्या तंत्रज्ञानात घडल्यामुळेच आजचा दिवस हा खास आहे, असे नासा एज्युकेटर आणि खगोल शास्त्रज्ञ लीना बोकील यांनी सांगितले.
हेही वाचा -Summer Special Train : मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! उन्हाळ्यात धावणार ६२६ विशेष ट्रेन