महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोण होणार पुण्याचे पालकमंत्री ? चंद्रकांत पाटलांचे नाव आघाडीवर

गिरीश बापट यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गिरीश बापट

By

Published : Jun 3, 2019, 9:55 PM IST

पुणे- पालकमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा मंगळवारी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. पालखी आढावा बैठकीत त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे पुण्याचे नवीन पालकमंत्री कोण होणार याची चर्चा पुणेकरांमध्ये सुरू झाली आहे.

गिरीश बापट


गिरीश बापट यांनी पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवली. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर मंगळवारी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बापट यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्याचा पालकमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मात्र याविषयी गिरीश बापट यांना विचारले असता, पालकमंत्री कोण याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री घेतील. येत्या काही दिवसात पुण्याचे पालकमंत्री जाहीर होतील, असेही त्यांनी सांगितले. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्ह्यात संपर्क वाढवला होता. त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details