पुणे : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाची वेबसाईट क्रॅश झाली आहे. दहावीचा निकाल mahresults.nic.in, sscresult.mkcl.org आणि maharashtraeducation.com. या संकेतस्थळांवर जाहीर केला जाणार आहे. मात्र साईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राज्याचा निकाल ९९.९५ टक्के
इतिहासात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या शैक्षणिक वर्षानंतर परीक्षेशिवाय अंतर्गत मूल्यमापनाद्वारे तयार केलेला दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९५ इतकी आहे.