महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नगरमध्ये 'सैराट' प्रकरण : दोषींना फाशी व्हावी, अत्यवस्थ असलेल्या मंगेशच्या भावाची मागणी

भाऊ मंगेश हा ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची परिस्थिती अजूनही नाजूक आहे. त्यामुळे संबंधितांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही महेश रणसिंग यांनी केली आहे.

जखमी मंगेश रणसिंग याचा भाऊ महेश रणसिंग

By

Published : May 7, 2019, 1:18 PM IST

Updated : May 7, 2019, 2:40 PM IST

पुणे - मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलगी व जावयाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली. यावेळी आंतरजातीय विवाह केलेला मंगेश रणसिंग हा गंभीर जखमी झाला आहे. त्याचा भाऊ महेश रणसिंग याने दोषींना फाशी व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यांना धडा मिळायला पाहिजे, अशी त्याने भावना व्यक्त केली आहे.

महेश रणसिंग म्हणाले की, गेल्या ६ महिन्यांपूर्वी माझा भाऊ मंगेश रणसिंग याचा विवाह झाला होता. हा विवाह मुलीच्या आईला मान्य होता. मात्र, तिच्या कुटुंबातील इतर नातेवाईकांनी या विवाहाचा विरोध केला होता. त्यामुळे वहिनींच्या कुटुंबीयांकडून अनेकदा माझ्या भावावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जखमी मंगेश रणसिंग याचा भाऊ महेश रणसिंग


पोलिसांनी तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप-
वहिनीला ३० एप्रिल रोजी तिच्या कुटुंबीयांनी घरी बोलवून घेतले होते, असे महेश रणसिंग यांनी सांगितले. त्यानंतर तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर भाऊ त्यांच्या घरी गेला. तेथील परिस्थिती बघितल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली होती. मात्र, त्याच्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

भाऊ मंगेश हा ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची परिस्थिती अजूनही नाजूक आहे. त्यामुळे संबंधितांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही महेश रणसिंग यांनी केली आहे.

Last Updated : May 7, 2019, 2:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details