पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक ( Shivsena Leader Raghunath Kuchik ) यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्याऱ्या ( Rape Allegation On Raghunath Kuchik ) पीडित तरुणीने आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप ( Rape Victims Allegation On Chitra Wagh ) केलेत. चित्रा वाघ यांनी आपल्याला सुसाईड नोट ( Suicide Note Raghunath Kuchik Case ) लिहायला लावल्याचा धक्कादायक आरोप या पीडित मुलीने केला आहे. तसेच कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांच्याच माणसांनीच आपलं अपहरण करुन गोव्याला नेल्याचाही आरोपही या तरुणीने केलं आहे.
चित्रा वाघ यांच्या दबावामुळे मला तक्रार दाखल करावी लागली :शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे एका 22 वर्षीय तरुणीने बलात्काराची तक्रार केली होती. यानंतर राजकारण चांगलच तापलं होत. माझ्यात आणि कुचिक यांच्यात जे झालं झालं आहे ते खरं आहे पण मला तक्रार द्यायची नव्हती. जेव्हा माझ्या एका अंकलच्या सहाय्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी संबंध आला. तेव्हा चित्रा वाघ यांच्या दबावामुळे मला तक्रार दाखल करावी लागली असल्याचा धक्कादायक खुलासा यावेळी पीडित तरुणीने केला आहे.