महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

यशाची गुढी; पुण्याच्या तृप्ती धोडमिसेंनी युपीएससी परीक्षेत पटकावला १६ वा क्रमांक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. पुण्याची तृप्ती धोडमिसे यांनी देशात १६ वा क्रमांक पटकावला आहे.

By

Published : Apr 6, 2019, 10:22 AM IST

तृप्ती धोडमिसे

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. पुण्याची तृप्ती धोडमिसे यांनी देशात १६ वा क्रमांक पटकावला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या तृप्ती यांना आयटी क्षेत्रात करियर करण्याचा विचार होता. तृप्ती यांचे आई-वडील हे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत.

तृप्ती धोडमिसे यांची प्रतिक्रिया

सुरुवातीपासूनच तृप्ती यांचा अभ्यासाकडे ओढा होता. २०१० साली त्यांनी पुण्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून शिक्षण पूर्ण केले. कॅम्पसमधून त्यांना खासगी कंपनीत चांगली नोकरी मिळाली. ४ वर्षे नोकरी करत असतानाच त्यांनी राज्यसेवेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात त्यांना सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून पद मिळाले. सध्या त्या पुण्यात सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

सुधाकर नवत्रे यांच्याशी तृप्ती यांचे लग्न झाले. माहेरप्रमाणेच सासरच्या मंडळींकडून ही त्यांना प्रोत्साहन मिळाले. त्यांनी लोकसेवा आयोगाची तयारी सुरू केली. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात तृत्प्ती यांनी देशात १६ वा क्रमांक पटकावला. एकीकडे सरकारी नोकरी, दुसरीकडे घरची जबाबदारी आणि देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षा असा तिहेरी संघर्ष त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. हे यश अपेक्षितच होते त्यामुळे अपेक्षापूर्तीचा आनंद असल्याची भावना या यशानंतर तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details