बारामतीमाळेगाव येथील शिवाजी रामचंद्र तावरे यांच्यावर बारामतीतील एका खासगी रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरू होते त्यातच त्यांना काविळ झाल्याने त्यांची तब्येत जास्तच खालावत जात होती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तावरे यांच्याकडे फार वेळ नसल्याने त्यांच्या काही इच्छा असतील तर त्या पुर्ण करा अशा सूचना कुटुंबीय व मित्रांना दिल्या होत्या माझ्या डोळ्या देखत मुलीचे लग्न व्हावे मग मी डोळे मिटून घेईन अशी इच्छा मृत्युशय्येवर असलेल्या शिवाजी तावरे यांनी मित्र तसेच कुटुंबाकडे व्यक्त केली.
लागलीच मित्रांनी वर शोधण्यास सुरुवात केली याकामी माजी सरपंच दीपक तावरे माजी सभापती अविनाश गोफणे डॉ.राजेंद्र सस्ते महमंद शेख शरिफ बागवान यांची भुमिका महत्वाची ठरली मुलगी शिवानी व बारामती तालुक्यातीलच पाहुणेवाडी येथील वैभव जराड यांच्याशी विवाह लावण्यात आला यावेळी शिवाजी तावरे हे स्ट्रेचरवरच लग्नाला उपस्थित राहिले मुलीच्या चेह-यावर हात फिरवत माझी मुलगी खूप गुणांची आहे तुझे कल्याण करेल असे त्यांनी जावई वैभव यास सांगीतले