महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यातील सिनेमागृहातील समोसे खाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी - sps biryani

काही दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध एसपीजी (SPG) हॉटेलच्या बिर्याणीत अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील सिनेमागृहातील समोसे खाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी

By

Published : Jun 9, 2019, 5:38 PM IST

Updated : Jun 9, 2019, 6:43 PM IST

पुणे- नामांकित सिनेमागृहात समोसे पुरवणाऱ्या मे. एम. के. इंटरप्राइजेस या उत्पादकाला समोसे तयार करण्यावर व विक्री करण्यावर अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे. हे समोसे तयार होत असलेल्या कारखान्यात नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. खराळवाडी, पिंपरी येथील समोसा उत्पादक कारखाना मे.एम.के. इंटरप्राइजेस यांचा उत्पादन व विक्रीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश एफडीएने दिले.

पुण्यातील सिनेमागृहातील समोसे खाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी

या कारखान्यात तयार होणारे समोसे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीव्हीआर, आयनोक्स, सिनेपोलिस आणि विशाल ई-स्क्वेअर या नामांकित सिनेमागृहात विकले जात होते. मे.एम.के. इंटरप्राइजेस या खराळवाडी येथील कारखान्यात स्वच्छतेचा अभाव आढळून आला. याशिवाय समोसे तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचा तिनपेक्षा अधिकवेळा वापर करणे, वापरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली याची माहिती न ठेवणे, अशा नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

पुण्यातील सिनेमागृहातील समोसे खाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी

पुण्यातील खाद्यपदार्थ तुमचे आरोग्य बिघडवतायेत का?
काही दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध एसपीजी (SPG) हॉटेलच्या बिर्याणीत अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी ग्राहकाने हॉटेल प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असता, हॉटेल कर्मचाऱ्यांनी उलट ग्राहकालाच दमदाटी केली. दरम्यान या घटनेबाबत पुणेकरांनी संताप व्यक्त केला होता.

पुण्यातील सिनेमागृहातील समोसे खाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी

यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडींमध्ये पुण्यातल्या लोकप्रिय हॉटेल्सचा ढिसाळ आणि गलिच्छ कारभार समोर आला आहे. या हॉटेलमधल्या किचनमध्ये कचऱ्याचे साम्राज्य आढळून आले होते. तसेच, या हॉटेलमध्ये शिळे पदार्थ वापरले जात असल्याचेही समोर आले आहे. यामध्ये शहरातील एफसी रोडवरच्या प्रसिद्ध रुपाली, वैशाली आणि कॅफे गुडलकचा समावेश होता.

Last Updated : Jun 9, 2019, 6:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details