महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'शिवसेना नाव बदलून ठाकरेसेना करा' - udayanraje on sanjay raut

शिवसेनेला शिव नाव दिलं; त्यावेळी आम्हाला विचारलं का, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांना केला आहे. शिवसेनेमधील शिव नाव काढल्यास तुमच्या मागे कोणीही उभे राहणार नाही,असे ते म्हणाले.

udayanraje speaks on sanjay raut
शिवसेनेला शिव नाव दिलं, त्यावेळी आम्हाला विचारलं का, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांना केला आहे.

By

Published : Jan 14, 2020, 1:07 PM IST

Updated : Jan 14, 2020, 2:19 PM IST

पुणे- शिवसेनेला शिव नाव दिलं, त्यावेळी आम्हाला विचारलं का, असा सवाल शिवसेनेला आणि संजय राऊत यांना केला. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकाचा निषेध करावा, राजीनामा द्यावा, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं, त्यावर उदयनराजे यांनी टीका केली. परत बोलाल तर जनता धरून हाणेल, असा इशाराही त्यांनी सेनेला दिला. शिवाजी महाराज हे केवळ आमचे नाहीत, तर ते समस्त जनतेचे आहेत, असे ते म्हणाले. शिवजयंती वेगवेगळ्या दिवशी का साजरी करतात, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

शिवसेनेवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, महाशिवआघाडी, शिव वडापाव यावरही त्यांनी हल्लाबोल केला. शिवसेनेने महाशिवआघाडीतलं शिव का काढलं, असा सवाल त्यांनी केला. वंशज म्हणून आमच्यावर टीका करता. महाराजांचे आमच्यावर संस्कार आहेत. सत्तेसाठी आम्ही कोणाच्या मागे फिरत नाही. कुत्र्यासारखे धावलो नाहीत. खासदारकीला पराभूत झाल्यानंतर राजीनामा फेकला. शिवस्मारकाचं काय झालं, मुंबई, भिवंडीची दंगल कोणी घडवली, जेम्स लेनवेळी सेना का गप्प होती, स्वार्थाने एकत्र आलेले लोक फार काळ एकत्र राहत नाहीत. शिवाजी महाराजांनी स्वत:चं घर कधी भरलं नाही

Last Updated : Jan 14, 2020, 2:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details