महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यातील उत्तमनगर येथे गॅरेजला भीषण आग, दोन जण जखमी - गॅरेजाल आग लागून दोन जखमी

या आगीत गरेजमधील सर्व सामान जळून खाक झाले आहे. रात्री लागलेल्या या आगीत गॅरेजचे मोठे नुकसान झाले आहे.अग्निशामक दलाच्या 5 गाड्यांनी आग अटोक्यात आणण्यात यश आले आहे. जे दोन जण गंभीर जखमी आहे त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे.

गॅरेजला भीषण आग, दोन जण जखमी
गॅरेजला भीषण आग, दोन जण जखमी

By

Published : Aug 8, 2021, 10:15 AM IST

Updated : Aug 8, 2021, 11:16 AM IST

पुणे- पुण्यातील कोपरगाव उत्तमनगर येथे एका गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री 11:30 च्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन जण गंभीर जखमी झाले असून, जखमीना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर आगीत गॅरेज मधील गाड्या जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यातील उत्तमनगर येथे गॅरेजला भीषण आग
उत्तमनगर कोपरेगाव येथे बस गाड्या दुरुस्तीचे मोठे गॅरेज आहे. रात्री या गॅरेजला आचानक आग लागली. आगाची माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून गॅरेज मधील तीन बस जळून खाक झाल्या आहेत. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

या आगीत गरेजमधील सर्व सामान जळून खाक झाले आहे. रात्री लागलेल्या या आगीत गॅरेजचे मोठे नुकसान झाले आहे.अग्निशामक दलाच्या 5 गाड्यांनी आग अटोक्यात आणण्यात यश आले आहे. जे दोन जण गंभीर जखमी आहे त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Last Updated : Aug 8, 2021, 11:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details