पुणे - महाराष्ट्रात आढळलेले पहिले कोरोना बाधित दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 9 मार्चला हे पहिले दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे.
आशादायक: पुण्यातील पहिले दोन रुग्ण कोरोना मुक्त, रुग्णालयातून मिळाला 'डिस्चार्ज' - नायडू रुग्णालय
कोरोना व्हायरसने हाहाकार उडाला असताना एक आशादायक बातमी आली आहे. पुण्यात आढळलेले दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज सुटी मिळली आहे.
या रुग्णांची 14 दिवसानंतर पहिली टेस्ट करण्यात आली, ती निगेटिव्ह आली. त्यांनतर मंगळवारी पुन्हा दुसरी टेस्ट करण्यात आली, ती देखील निगेटिव्ह आढळल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यामुळे ही मोठी दिलासा देणारी बाब आहे. यासोबत आणखी एक दिलासा देणारी बाब म्हणजे पहिल्या दोन रुग्णानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आणखी दोन रुग्णांची 14 दिवसानंतर करण्यात आलेली पहिली टेस्ट निगेटिव्ह आली. आज त्यांची दुसरी टेस्ट घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.