पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनीत बाजपेयींच्या तक्रारीवरून गुन्हा
पंतप्रधान व योगी आदित्यनाथांची सोशल मीडियावर बदनामी; पुण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल
आरोपींनी घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणत जाणीवपूर्वक त्यांची बदनामी केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात भादंवि 469, 500 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनीत भरत कुमार बाजपेयी (वय 38) यांनी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी विनीत भरत कुमार बाजपेयी (वय 38) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मोहसीन ए शेख आणि स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर या दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करून ते फेसबुक या सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. वरील आरोपींनी घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणत जाणीवपूर्वक त्यांची बदनामी केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात भादंवि 469, 500 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पवारांच्या बदनामीप्रकरणीही गुन्हा दाखल
दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बदनामी केल्या प्रकरणी नऊ जणांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.