पुणे - अनैतिक संबंधातून एकाचा डोक्यात फरशी मारून खून केल्याची घटना समोर आली आहे. निलेश खैराळे (वय ४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हितेश किशोर घोरण (वय २६) रोहित किशोर घोरण (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत.
पुण्यात घटस्फोटीत पत्नीशी अनैतिक संबंधातून तरुणाचा खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित याच्या घटस्फोटीत पत्नीशी मृत तरुणाचे अनैतिक संबंध होते. आरोपी आणि मृत व्यक्ती एकाच परिसरात राहात होते. यामुळे आरोपी रोहितची नाहक बदनामी होत होती. याच रागातून त्याने खून केल्याचा संशय पोलिसांना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित याच्या घटस्फोटीत पत्नीशी मृत निलेश याचे अनैतिक संबंध होते. आरोपी आणि मृत व्यक्ती एकाच परिसरात राहात होते. यामुळे आरोपी रोहितची नाहक बदनामी होत होती. याच रागातून त्याने खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. रात्री उशिरा आरोपी रोहित, हितेश आणि मृत निलेश हे शेजारी औंध रुग्णालयाच्या मैदानात दारू पिण्यासाठी बसले होते. तेव्हा, त्यांच्यात बाचाबाची झाली होती.
यानंतर तिसऱ्या व्यक्तीने मृताच्या घरी जाऊन भांडण झाल्याचे सांगितले. मध्यरात्री दोन्ही सख्ख्या भावांनी निलेशला औंध रुग्णालयाच्या मुख्य गेटमध्ये नेऊन डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी करत ठार केले. ही घटना रविवारी सायंकाळी समोर आली. या प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.