महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivaji Maharaj Jayanti 2022 : शिवजयंती निमित्त पुण्यातील जनता वसाहतीत फडकले हजारो भगवे झेंडे - भगवे झेंडे जनता वसाहत शिव जयंती

महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात शिवजयंती ( Shivaji Maharaj Jayanti 2022 ) दोन वेळा साजरी केली जाते. पहिली शिवजयंती ही तारखेनुसार आणि दुसरी शिवजयंती ही तिथीनुसार. पुण्यात शिवजयंती निमित्त एका शिवभक्ताने पर्वती येथील जनता वसाहतीमध्ये ( Five thousand flag Janta Vasahat ) साधारणत: 5 हजार भगवे झेंडे लावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रति आपला आदर व्यक्त केला.

five thousand flag Janta Vasahat
भगवे झेंडे जनता वसाहत शिव जयंती

By

Published : Mar 21, 2022, 6:53 AM IST

पुणे - महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात शिवजयंती ( Shivaji Maharaj Jayanti 2022 ) दोन वेळा साजरी केली जाते. पहिली शिवजयंती ही तारखेनुसार आणि दुसरी शिवजयंती ही तिथीनुसार. पुण्यात शिवजयंती निमित्त एका शिवभक्ताने पर्वती येथील जनता वसाहतीमध्ये ( Five thousand flag Janta Vasahat ) साधारणत: 5 हजार भगवे झेंडे लावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रति आपला आदर व्यक्त केला. सुरेश लोखंडे असे या शिवभक्ताचे नाव आहे.

माहिती देताना शिवप्रेमी सुरेश लोखंडे आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा -Raghunath Kuchik : शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारी पीडित तरुणी ईटीव्ही भारतवर.. पहा धक्कादायक खुलासे

शिवाजी महाराज हे कोणत्या धर्माचे समर्थक नव्हते. तर, ते सर्व हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई या सर्वांना एकत्र धरून हिंदवी स्वराज्य घडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेत होते. सुरेश लोखंडे यांनी झेंडे लावून आपल्या भावना व्यक्त केल्या. आज समाजाला शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा, त्यांच्याबद्दल आदर निर्माण व्हावा आणि शिवाजी महाराजांचे कार्य चालत राहावे यासाठी प्रेरणा देण्यासाठी, शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि त्यांच्या साथिदारांनी त्यांना कशा प्रकारे स्वराज्यनिर्मितीसाठी साथ दिली, प्राणांची बाजी लावली आणि स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, याचा इतिहास लोकांपर्यंत पोहचावा यासाठी शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा -The Kashmir Files Controversy : 'तेंव्हाच्या सरकारमध्ये भाजपाचेच लोक होते', काश्मीर फाईल्सवरून शरद पवारांचे टीकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details