पुणे - सोनसाखळी खरेदीच्या बहाण्याने दागिन्याच्या दुकानात आलेल्या चोरट्याने सराफा व्यावसायिकावर सुर्याने हल्ला करून चोरीचा प्रयत्न केला. ही घटना पुण्यातील धनकवडी येथे घडली. या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -Devendra Fadnavis In Indapur : शरद पवार यांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? - देवेंद्र फडणवीस
गौरव विजय रायकर (वय. 25 रा. धायरी) असे आरोपीचे नाव आहे. गुरूवारी दुपारी पावनेपाचच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथील वैभवलक्ष्मी ज्वेलर्समध्ये ही घटना घडली होती. चोरट्याच्या हल्ल्यात विनोदकुमार सोनी (वय.42 रा. आंबेगाव खुर्द) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि चोरट्याला ताब्यात घेतले.
सोनी यांचे आंबेगाव खुर्द येथील पृथ्वीराज हाईटस् या इमारतीत वैभवलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आरोपी रायकर हा त्यांच्या दुकानात आला होता. आई-वडील पाठीमागून येत आहेत, मला सोनसाखळी खरेदी करायची आहे, असे त्याने सोनी यांना सांगितले. सोनी यांनी रायकरला बसण्यास सांगितले. यावेळी रायकरने तुम्ही सोने कसे देता, पैसे रोख की ऑनलाईन घेणार अशी विचारणा केली व थेट पिशवीतून सुरा काढून त्यांच्यावर हल्ला करत दागिणे चोरीचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत सोनी यांनी रायकरचा प्रतिकार करण्यास सुरूवात केली. दोघांत झटापट सुरू झाली, त्यानंतर रायकर याने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला पकडण्याच्या तपास पथकाला सूचना केल्या. त्यानुसार पथकाने रायकर याला ताब्यात घेतले.
हेही वाचा -Sharad Pawar : ब्राह्मण समाजातील संस्थांना शरद पवार यांनी बोलावले बैठकीला...पण