महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणे : बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने सासूच्या 2 लाखांवर डल्ला मारून जावई फरार - जावयाने चोरले 2 लाख

सासू नजराना बेगम ह्या भांडुपमधील सोनापूर भागात राहतात. ९ सप्टेंबर रोजी त्यांनी बुलडाणा जिल्ह्यतील खामगाव येथील त्यांचा प्लॉट विक्री केला होता. त्यामधून त्यांना २ लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली होती. हीच रक्कम त्यांनी मुलगी आयशा सोयब शेख यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली. त्यावेळी आरोपी जवायाने ही रक्कम मला द्या, मी घरात सुरक्षित ठेवतो म्हणून घरातील सज्जावर असलेल्या एका डब्ब्यात ठेवली होती.

जावयाने चोरले 2 लाख
जावयाने चोरले 2 लाख

By

Published : Sep 21, 2021, 7:38 PM IST

ठाणे -सासूने मुलीकडे दोन लाख रुपयांची रोकड ठेवण्यासाठी दिली होती. मात्र त्या पैशांवर जावयाने डोळा ठेवून बाथरूमला जाऊन येतो, असे सांगत घरातील एका डब्ब्यात ठेवलेले दोन लाख रुपये घेऊन पसार झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील कादरिया मस्जिदलगत असलेल्या खोलीत घडली आहे. याप्रकरणी सासू नजराना बेगम जाहीर खान यांनी जावयाविरोधात पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सोयब अब्दुल सत्तर शेख (वय ३५, रा. तुंगागाव, पवई, मुंबई ) असे गुन्हा दाखल झालेल्या जवायाचे नाव आहे.

प्लॉट विक्री करून सासूने मुलीकडे ठेवण्यासाठी दिले २ लाख

सासू नजराना बेगम ह्या भांडुपमधील सोनापूर भागात राहतात. ९ सप्टेंबर रोजी त्यांनी बुलडाणा जिल्ह्यतील खामगाव येथील त्यांचा प्लॉट विक्री केला होता. त्यामधून त्यांना २ लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली होती. हीच रक्कम त्यांनी मुलगी आयशा सोयब शेख यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली. त्यावेळी आरोपी जवायाने ही रक्कम मला द्या, मी घरात सुरक्षित ठेवतो म्हणून घरातील सज्जावर असलेल्या एका डब्ब्यात ठेवली होती.

आरोपी जावयाच्या शोधात पोलीस पथक रवाना, मात्र...

आरोपी जावयाची नजर सासूच्या दोन लाखांवर होती. त्यातच १९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास जावई सोयब हा घराबाहेर बसला असतानाच बाथरूमला घरात जाऊन येतो, असे सांगून घरातील सज्जावर ठेवलेल्या डब्यातील दोन लाख रुपये घेऊन पसार झाला. मात्र बराच वेळ झाला जावई घरी आला नाही. डब्बातील रक्कमही गहाळ असल्याचे दिसून आले. याप्रकरणी सासूने शांतीनगर पोलीस ठाण्यात जावयाविरोधात गुन्हा दाखल केला असता पोलीस पथक त्याच्या शोधात पवई येथील घरी गेले होते. मात्र तो आढळून आला नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चिरमाडे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details