पुणे - लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्ताने तसेच, गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईतील सरदार भवनात मूर्तिकार कै. केशव लेले यांनी 18 वर्षाच्या वयात 102 वर्षांपूर्वी साकारलेला लोकमान्य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा केसरीवाडयात स्थापित करण्यात आला आहे. 1919 मध्ये लेले यांनी लोकमान्य टिळकांसमोर बसून तयार केलेला त्यांचा हा पुतळा आरामखुर्चीत बसलेल्या स्थितीत लोकमान्य टिळकांच्या अभ्यासिकेत स्थापित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती लोकमान्य टिळकांचे पंतु शैलेश टिळक यांनी दिली.
लोकमान्य टिळकांचा पहिला पूर्णाकृती पुतळा केसरीवड्यात स्थापित पूर्णाकृती पुतळ्याचे काय आहे इतिहास
102 वर्षांपूर्वी वयाच्या 18 व्या वर्षी मूर्तिकार कै. केशव लेले यांनी लोकमान्य टिळकांच्या अभ्यासिकेत टिळकांच्या समोर बसून हा पुतळा तयार केला होता. लोकमान्य टिळकांचा हा पुतळा 1919 नंतर पुढील 80 वर्षे दादर येथे लेले कुटुंबियांच्या निवासस्थानी ठेवला होता. त्यांनतर 1999 मध्ये पुण्यातील महात्मा सोसायटी येथे वास्तव्य करणारी त्यांची नात डॉ. चित्रा लेले यांच्या घरी पुतळा हलवण्यात आला होता. तो चांगल्या ठिकाणी ठेवण्यात यावा अशी लेले कुटुंबियांची इच्छा होती. जेव्हा लोकमान्यांचे निवासस्थान असलेल्या वास्तूंचे नूतनीकरण होईल, तेव्हा हा पुतळा तेथे स्थापित करू, असे सांगितले होते. त्यानंतर या वस्तूंचे नूतनीकरण झाले. त्या पार्श्वभूमीवर आज लोकमान्य टिळकांची अभ्यासिका होती तेथे हा पुतळा स्थापित करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती यावेळी शैलेश टिळक यांनी दिली.
टिळकांचा पहिला पूर्णाकृती पुतळा केसरीवड्यात स्थापित लोकमान्य टिळकांच्या वस्तूचे करण्यात येत आहे नूतनीकरण
केसरी वाड्यात ज्या ठिकाणी लोकमान्य टिळक यांचे वास्तू होती. त्या ठिकाणी हुबेहूब अशी नवीन वास्तू तयार करण्यात येत आहे. त्याकाळचे जे काही आमच्याकडे फोटोग्राफ होते. त्याच पद्धतीने या वास्तूचे नूतनीकरण होत आहे. तसेच, याचा सर्व खर्च हे टिळक कुटुंबीय करत आहेस, असही टिळक यांनी सांगितले आहे. लोकमान्य टिळकांना सामोरासमोर बसवून बनवलेला एकमेव हा पूर्णाकृती पुतळा आहे. या आगोदर त्यांचा अर्धाकृती पुतळा तयार करण्यात आला होता.
लोकमान्य टिळकांचा पहिला पूर्णाकृती पुतळा केसरीवड्यात स्थापित