महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Beaten and robbed : एकांतात फिरायला गेलेल्या युगुलाला मारहाण करून लुटले

पाषाण परिसरात एकांतात फिरायला जाणे एका युगुलाला (The couple) चांगलेच महाग पडले आहे. प्रियकर प्रेयसीस तीन चोरट्यांनी एकांतात गाठले ( three thieves) आणि ठार मारण्याची धमकी (By threatening to kill) देऊन मारहाण करत लुटल्याची घटना समोर आली आहे. यात चोरट्यांनी या दोघांकडील सुमारे 1 लाख रूपयांचा ऐवज लंपास केला.

Beaten and robbed
प्रेमी युगुलाला लुटले

By

Published : Dec 22, 2021, 3:28 PM IST

Updated : Dec 22, 2021, 3:42 PM IST

पुणे: पिंपरी चिंचवड मधील केशवनगर भागात राहणारेगौरव बाळासाहेब तेलंग (34) हे एका संस्थेत कार्यरत आहेत. काम संपल्या नंतर ते त्यांच्या सहकारी मैत्रिणीला घेऊन पाषाण भागातील सुस खिंडीकडे फिरायला गेले. तेव्हा तीन तरूनही तेथे पोचले. त्यांनी या दोघांना धमकावत मारहाणही केली नंतर मारून टाकण्याची धमकीदेत त्या मुलीकडील 25 ग्रॅम वजनाचे 90 हजार रूपयांचे दागिने, दोन मोबाईल, चांदीची अंगठी आणी रोख असा साधारण 1 लाख 7 हजाराच्या वस्तु ओरबडून नेल्या. चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Dec 22, 2021, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details