पुणे -कोरोना संकटकाळात अत्यंत काळजी घेण्याची गरज असताना, पुणे शहराची शान असलेला गणेशोत्सव संयमाने साजरा केला. पुणेकर नागरिकांनी आपल्या उत्साहाला, भावनांना मुरड घालत संयमाने उत्सव साजरा केला. याबद्दल सर्व पुणेकरांचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत.
संयमाने गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल पुणेकरांचे आभार - महापौर मुरलीधर मोहोळ
गणेशोत्सव हा पुण्याची शान आहे. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शहरात हा उत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने त्याचे सावट गणेशोत्सवावर होते.
गणेशोत्सव हा पुण्याची शान आहे. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शहरात हा उत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने त्याचे सावट गणेशोत्सवावर होते. मात्र, पुणेकरांनी संयम राखत आपल्या भावनांना आणि उत्साहाला मुरड घातली, असे महापौर म्हणाले. या काळात महापालिका तसेच पोलीस प्रशासनाने चांगले काम केले. नागरिकांनीही त्यांना चांगली साथ दिल्याचे महापौर म्हणाले. महापौरांच्या उपस्थितीत मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. सर्व पाच मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर महापौर बोलत होते.