महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक - टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला अटक

टीईटी घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून एका आयएएस अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली असून, घोटाळ्यात एका आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुशील खोडवेकर (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

TET Exam Scam
TET Exam Scam

By

Published : Jan 29, 2022, 3:07 PM IST

Updated : Jan 29, 2022, 6:51 PM IST

पुणे -टीईटी घोटाळा (TET Exam Scam)प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून एका आयएएस अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली असून, घोटाळ्यात एका आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुशील खोडवेकर (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक
पुणे पोलिसांकडून २०१९-२० चा टीईटी घोटाळा उघडकीस आणण्यात आला आहे. याप्रकरणात आयुक्त तुकाराम सुपे तसेच शिक्षण विभागाचा सल्लागार अभिजीत सावरीकर यांना पकडण्यात आले आहे. आत्तापर्यंत या पेपरफुटी प्रकरणात 40 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. यात काही शासकीय नोकरदार तसेच एजंट आणि चैनमधील इतरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे तपास केले जात आहे. त्यादरम्यान, अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचा देखील या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले. आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर हे उपसचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत आहेत.
Last Updated : Jan 29, 2022, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details