पुणे -टोल न देता कोणतेही वाहन जाऊ नये, अशी कडक नियमावली आहे. मात्र, तसे असतानाही मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर ( Mumbai Pune Highway ) दररोज तब्बल 10 हजार वाहने टोल न देता जात ( Vehicles Travel Without Paying Toll ) असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने ( Maharashtra State Road Development Board ) दिली आहे. तर समोर आलेली आकडेवारी ही संशायस्पद असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर ( Rti Activist Vivek Velankar ) यांनी केला आहे. त्यामुळे 'टोल' मध्ये मोठा 'झोल' झाल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे.
काय आहे नेमक प्रकरण
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहिती आयुक्तांकडे मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या वाहनांची माहिती मागवली होती. त्यानंतर माहिती अधिकार आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून मुंबई - पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यात फक्त डिंसेबर महिन्यात साडेतीन लाख वाहनांनी मुंबई - पुणे महामार्गावर टोल न देता प्रवास केल्याचे सांगण्यात आले.