महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis Allegations : दारुवरचे कर कमी होतात, पण पेट्रोल-डिझेलचे नाही -देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारने दारूवरचा कर कमी केला, (Reduced tax on Alcohol) पण पेट्रोल-डिझेलवरचा कर (Petrol Diesel Tax) कमी केला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की राज्यात कुठेही शासन नाही, अशी टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

Devendra Fadnavis critisize state government
Devendra Fadnavis critisize state government

By

Published : Dec 3, 2021, 5:38 PM IST

Updated : Dec 3, 2021, 6:55 PM IST

पुणे -राज्य सरकारने दारूवरचा कर कमी केला, (Reduced tax on Alcohol) पण पेट्रोल-डिझेलवरचा कर (Petrol Diesel Tax) कमी केला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की राज्यात कुठेही शासन नाही, अशी टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. सध्या राज्यात सरकार आहे, पण शासन नाही. शेतकरी असो किंवा शेतमजूर असो किंवा गरीब किंवा मागासवर्गीय असो, शहर असो कि गांव असो, कुठंही नवीन काम होताना दिसत नाही. विजेचे कनेक्शन कापणे किंवा पेट्रोल-डिझेल वरचा कर सर्व राज्यांनी कमी केले पण महाराष्ट्र एकमेव असा राज्य आहे कि ज्याने ते कर कमी केलं नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुण्यातील बाणेर येथे एका कार्यक्रमानिमित्ताने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी ते बोलत होते.

Devendra Fadnavis critisize state government

'सरकार विरोधात जे बोलतात त्यांच्यावर कारवाई' -

परमवीर सिंह यांच्यावर कारवाई झाली, त्याबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की 'मला असं वाटत आहे की हे कन्फ्यूस सरकार आहे. कोणावर कारवाई करावी, कोणावर करू नये हे त्यांच्याजवळ सातत्याने प्रश्न निर्माण होत आहे. मुळातच खरे आरोपींवर कारवाई करायला सरकार पुढे मागे पाहत आहे. परमवीर सिंह यांच्यावर जी काही कारवाई करण्यात आली आहे. त्या कारवाईबाबत मी एवढंच सांगेन कि जशी तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली तशी ज्यांच्या-ज्यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांच्यावर कारवाई करावी. सरकार विरोधात जे बोलत आहेत, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. हे योग्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.

'तर महाराष्ट्रातील उद्योग निश्चित बाहेर जातील' -

मी ही मुख्यमंत्री होतो. राज्यात विविध राज्यातून मुख्यमंत्री हे येत असतात. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. उद्योगाशी ते चर्चा करतात. पण त्यामुळे उद्योग जातीलच असे नाही. यापूर्वी ज्या-ज्या वेळेला इतर राज्यातील मुख्यमंत्री राज्यात येत होते, तेव्हा आत्ताचे सत्तारूढ पक्ष हे त्यावेळेला टीका करत होते. आत्ता तेच लोक ममता बॅनर्जी यांच स्वागत करत आहे. राज्यातील उद्योग कोणीही कुठं घेऊन जाऊ शकत नाही. पण जर असे गव्हर्नर फेलियर्स राहीलं, तर महाराष्ट्रातील उद्योग निश्चित बाहेर जातील, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा -Rajesh Tope On Genomic Sequencing : 800 RT-PCR पैकी 28 जणांचे पाॅझिटिव्ह नमुने जिनोमीक सिक्वेसिंगसाठी पाठवले - राजेश टोपे

Last Updated : Dec 3, 2021, 6:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details