महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

..तर जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात स्वाभिमानी न्यायालयात याचिका दाखल करणार

साखर कारखान्यांनी ६० ते ८० टक्क्यांपर्यंत रक्कम दिली तर ३० साखर कारखाने हे ६० टक्क्यांपेक्षा कमी रक्कम देणारे साखर कारखाने आहेत. थकित रक्कम त्वरित द्यावी या संदर्भामध्ये साखर आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

तर जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार

By

Published : May 7, 2019, 12:45 PM IST

पुणे - राज्यात एफआरपीचे रक्कम थकवणार्‍या साखर कारखान्यांवर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर कर्तव्यात कसूर म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयात याचिका दाखल करेल, ज्या कारखान्यांनी एफआरपीची रक्कम मोठ्या प्रमाणात थकवली आहे त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने महसुली कारवाई करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

राजू शेट्टी यांनी सोमवारी पुण्यातल्या साखर संकुल येथे साखर आयुक्तांची भेट घेत थकित रकमेबाबतचा आढावा घेतला. राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी आतापर्यंत शंभर टक्के एफआरपी दिली आहे, तर ८० साखर कारखान्यांनी ८० ते ९० टक्के एफआरपीचे रक्कम दिलेली आहे. साखर कारखान्यांनी ६० ते ८० टक्क्यांपर्यंत रक्कम दिली तर ३० साखर कारखाने हे ६० टक्क्यांपेक्षा कमी रक्कम देणारे साखर कारखाने आहेत. थकित रक्कम त्वरित द्यावी या संदर्भामध्ये साखर आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मात्र अशा प्रकारची कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. राजकीय दबावापोटी मंत्र्यांच्या राजकीय नेत्यांच्या खासदार आमदारांच्या साखर कारखान्यांवर कारवाई केली नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात थकीत एफआरपी असलेले साखर कारखाने आहेत आणि हे साखर कारखाने मंत्र्यांचे राजकीय मोठ्या पुढाऱ्यांचे असल्याचे राजू शेट्टी म्हणाले, या थकित एफआरपी ठेवणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन सुरू करणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या कारखान्यांवर महसूल कारवाई करत जप्ती कारवाई करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रयत्न करणार आहे आणि यानंतरही जर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संबंधित जिल्हाधिकारी यांच्या विरोधात कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून न्यायालयात याचिका दाखल करेल, असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. शेट्टी यांनी दुष्काळाच्या परिस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. या सरकारने जाणून-बुजून दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि आता सध्याच्या परिस्थितीत मंत्र्यांचे फक्त दौरे या भागांमध्ये घेतले जात आहेत. प्रत्यक्षात दुष्काळग्रस्तांना कुठलीही मदत मिळत नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. या सगळ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असून सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज होती असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details