पुणे - कोविड लस ही पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा मीच काढली आहे, असे म्हणायचे नाही, असा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट नाव न घेता पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. त्या मावळ येथे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आढावा बैठकीत बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरमला भेट देत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. बाहेरून कोणी कोरोना लसीवर दावा केला, तर असा गैरसमज नसावा, असा टोला सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता लगावला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या मावळ भागात 1400- 1600 कोटींची विकास कामे होणार करणार असल्याचे म्हटले जात आहे. आम्हाला दिल्लीची सवय आहे. तुम्ही तर 1400 - 1500 कोटी म्हणत आहात. आमच्याकडे तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. कोण गप्पा मारतय हे तुम्हाला माहित आहे. ते आज पुण्यात आहेत.
हेही वाचा-बाबा रामदेव यांचे बंधु राम भारत होणार रुची सोयाचे एमडी; वार्षिक वेतन अवघा रुपया!
पुणेकरांनीच लस शोधलेली आहे-
शेवटी दुनियेत फिरलात पुण्याच्या पुढे काहीही नाही. (दुनिया, घुम लो. मगर पुना के आगे कुछ है नही.) जगभरात फिरलात तरी शेवटी पुण्यातच कोविडची लस सापडणार आहे. ती लस पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा मीच काढली आहे, असे म्हणायचे नाही, असा टोला सुळे यांनी मोदी सरकारne लगावला आहे पुढे त्या म्हणाल्या की, एक लक्षात ठेवा पुण्यातच ही लस झालेली आहे. पुणेकरांनीच लस शोधलेली आहे. बाहेरून कोणी दावा क्लेम केला तर असा गैरसमज नसावा अस म्हणत त्यांनी मोदी यांना टोला लगावला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.