महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Supriya Sule : दडपशाही करून संविधान बदलण्याचा केंद्र सरकारचा डाव - सुप्रिया सुळे - ploy to change the constitution

केंद्रातील मोदी सरकार ( Modi Govt ) भारतीय संविधान ( Indian Constitution ) बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule ) यांनी केला आहे. संसदेच्या आवारात कुठल्याही प्रकारच्या आंदोलन करायचं नाही म्हणजे ही देशात दडपशाही सुरू आहे असे सुळे म्हणाल्या त्या पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होत्या.

Supriya Sule
सुप्रिया सुळे

By

Published : Jul 15, 2022, 10:19 PM IST

पुणे -केंद्रातील मोदी सरकार संविधान बदलण्याचा ( Indian Constitution ) प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule ) यांनी केला आहे. संसद परिसरात भाजप विरोधात असताना गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करीत होते. आता आम्ही विरोधात असताना तर आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. परंतू संसदेच्या आवारात कुठल्याही प्रकारच्या आंदोलन करायचं नाही म्हणजे ही देशात दडपशाही सुरू असल्याच्या सुळे म्हणाल्या.

हेही वाचा -Vinayak Raut Criticized Eknath Shinde : फडणवीसांनी आज माइक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील; विनायक राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

देशाच्या संसदेमध्ये दडपशाही -राज्यघटनेतील आर्टिकल 19 च्या विरोधामध्ये हे ऑर्डर आहे. त्यात संविधानाचा अपमान केला जातो आहे. संविधान बदलण्याचं पाप केंद्र सरकार करत असून मी त्याचा मी निषेध करते. शनिवारी, रविवारी दिल्लीत सर्व पक्ष बैठक आहे त्यात आम्ही सविस्तर चर्चा करु असेही त्या म्हणाल्या. विरोधकांवर टीका करतांना विरोधका दिलदार असावा लागतो. त्याने आमच्यावर दिलदारपणे टीका करावी. देशाच्या संसदेमध्ये दडपशाही सुरू आहे. आम्ही दडपशाही वाले नाही हाच आमच्यात आणि भारतीय जनता पार्टी फरक आहे असल्याचे सुळे म्हणाल्या त्या पुण्यात पत्रकांराशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा -Sharad Pawar Criticized Shinde Government :...तर मी शिंदे सरकारचं अभिनंदन केलं असतं - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details