पुणे- किरकोळ वादावादीतून दोन इराणी नागरिकांना जबर मारहाण केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. सिंहगड रोडच्या माणिक बागेतला हा प्रकार असून शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. मोठा दगड घालून इराणी नागरिकांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. शेवटी वाहतूक पोलिसांनी मध्यस्थी केल्याने ही मारहाण थांबली.
पुण्यात किरकोळ वादावादीतून परदेशी नागरिकांना जबर मारहाण - citizen
किरकोळ वादावादीतून दोन इराणी नागरिकांना जबर मारहाण केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. वाहतूक पोलिसांनी मध्यस्थी केल्याने ही मारहाण थांबली.
परदेशी नागरिकांना जबर मारहाण
माणिकबाग परिसरातील एका किराणा दुकानात दोन इराणी नागरिक खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी झालेल्या वादातून या दोन पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या.