महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chief Minister Uddhav Thackeray : विद्यापीठाने सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसा अभ्यासक्रम राबवावा - मुख्यमंत्री

देश आणी समाज निरोगी असावयास हवा यासाठी समाजाला विचार देण्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या वर्तनात तो विचार आणला. देश स्वतंत्र झाल्यावर तो रुढी परंपरांमध्ये अडकलेला नसावा यासाठी महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांचा ज्ञानार्जनाबाबतचा विचार  स्वीकारला तर प्रगती शक्य आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आले  आणी भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने हे विचार समाजापर्यंत पोहोचले, असे म्हणता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) म्हणाले.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Feb 14, 2022, 5:04 PM IST

Updated : Feb 14, 2022, 5:31 PM IST

पुणे- सावित्रीबाई फुले या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुलं फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद ‍निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेल, असे अभ्यासक्रम व उपक्रम राबवावेत. जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ( Savitribai Phule Pune University ) येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Higher Education Minister Uday Samant ), विधान परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे ( Deputy Speaker of the Legislative Council Neelam Gorh ), विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) (दूरदृष्य प्रणालीद्वारे), राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Minister of State Prajakt Tanpure ), खासदार गिरीश बापट ( MP Girish Bapat ), महापौर मुरलीधर मोहोळ ( Mayor Murlidhar Mohol ) आदी उपस्थित होते.

ज्ञानार्जनाबाबतचा विचार स्वीकारला तर प्रगती शक्य आहे -देश आणी समाज निरोगी असावयास हवा यासाठी समाजाला विचार देण्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या वर्तनात तो विचार आणला. देश स्वतंत्र झाल्यावर तो रुढी परंपरांमध्ये अडकलेला नसावा यासाठी महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांचा ज्ञानार्जनाबाबतचा विचार स्वीकारला तर प्रगती शक्य आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आले आणी भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने हे विचार समाजापर्यंत पोहोचले, असे म्हणता येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे -महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून हे कार्य आपण पुढे नेले पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी केले. ते म्हणाले, फुले दाम्पत्यांनी ज्यावेळी समाजसुधारणेचे काम केले त्या काळात इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा समाजाला कुप्रथांपासून दूर करणे अधिक कठीण होते. त्या काळात समाजातील सर्वात दबलेल्या महिला, मातृशक्ती तसेच मागास, गरीब समाजाच्या उत्थानासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी काम केले. त्यांच्या शिक्षणप्रसाराच्या, समाजसुधारणेच्या कामाला प्रचंड विरोध झाला. पण, कुप्रथा दूर करण्याचे त्यांनी जे स्वप्न पाहिले ते जीवनाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम केले.

तर सावित्रीबाई फुले यांना आनंद झाला असता -सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा कालखंड हा इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवण्याचा, लिहिण्याचा कालखंड होता, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले. सावित्रीबाई आज असत्या तर विद्यापीठे, शैक्षणिक क्षेत्रात मुली, महिलांचे अग्रस्थान पाहून त्यांना अतिशय आनंद वाटला असता, असेही ते म्हणाले.

शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा नसावी - छगन भुजबळ -सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनावर जगातील विविध भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जीवनावर लहान पुस्तिका तयार करण्यात येणार आहेत. सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या वास्तूचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. महात्मा फुले यांचा पहिला पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे उभारला. अशा महापुरुषांमुळे सामान्य माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे कार्य झाले. सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत फातिमाबी शेख ( Fatimabi Shaikh ) या महिलेने शिक्षणाचा आग्रह धरला. प्रत्येक भेद दूर सारण्याच्या महापुरुषांनी प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा न देता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, त्यातून त्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडून येईल, असे यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

महात्मा फुले अध्यासनासाठी राज्य शासन देणार 3 कोटी - उदय सामंत -सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी तीन कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी दोन कोटी रुपये देण्यात येतील, असे यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले.

आज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम असलेली महिला समाजात ‍दिसते, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. -ऑनलाइनच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, आज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम असलेली महिला समाजात ‍दिसते, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याला सावित्रीबाईंची साथ होती. त्यांनी आणि महात्मा फुले यांनी समाजाला संघर्ष शिकविला. न्याय व ज्ञान यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अनेक हालअपेष्टा सहन करताना त्यांनी संघर्ष केला. विधवांच्या मुलांचे संगोपन, अंधश्रद्धेचा विरोध, बालहत्येचा विरोध अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचा 'काव्यफुले' हा संग्रह ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाला समर्पित आहे.

सावित्रीबाई लिंग समानता चळवळीच्या आधारस्तंभ - डॉ. नीलम गोऱ्हे -यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे कार्य अजरामर आहे. अनेक समाजसुधारकांनी या राज्यात समाजजागृतीचे कार्य केले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणी तत्वचिंतक होत्या. विधवा महिलांची बाळंतपण त्यांनी केली होती. सावित्रीबाई फुले लिंग समानतेच्या चळवळीचा आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार अध्यासनाच्या माध्यमातून व्हावा. त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरतील, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा - Minister Chhagan Bhujbal on Hijab : राजकारण्यांनी महाविद्यालयात विष फैलावू नये, सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे - मंत्री छगन भुजबळ

Last Updated : Feb 14, 2022, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details