पुणे - राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ( Schools Reopened Maharashtra ) आहे. ज्यामध्ये पहिली ते बारावीची शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, हा निर्णय लहान मुलांच्या बाबतीत किती योग्य आहे? याबाबत ईटीव्ही भारतने टास्क फोर्सचे डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं ( Dr Avinash Bhondwe Warned State Government ) आहे.
शाळा सुरु करणं लहान मुलांसाठी धोक्याचं : टास्क फोर्सच्या डॉक्टरांचा इशारा नववीपर्यंतच्या मुलांचं लसीकरण नाही
सध्या फक्त १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू ( Children Vaccination Maharashtra ) आहे. मात्र, पहिली ते नववीपर्यंतच्या मुलांना कोणत्याही प्रकारचे लसीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे अशावेळी शाळा सुरू करणं हे कितपत योग्य आहे, याचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा, असे मत डॉक्टर भोंडवे यांनी मांडले. तसेच मुलांना शाळेत पाठवणे हे धाडसाचं आणि मुलांच्या स्वास्थ्याच्यादृष्टीने धोक्याचे ठरेल, असे ते म्हणाले. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने कोव्हॅक्सिन कंपनीला २ ते १८ वयोगटासाठी आणि झायकोव्ह डी या कंपनीला ५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस तयार करण्याची परवानगी दिली ( Covid Preventive Vaccine For Children ) होती. त्यामुळे जर लहान मुलांच्या लसीकरणासाठी जर ऑक्टोबरपासून प्रयत्न केले गेले असते तर सर्व शालेय मुलांचे लसीकरण झाले असते. मात्र, त्यानुसार कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. तसेच मार्च महिन्यामध्ये साधारण १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांचे लसीकरण ना करताच शाळा सुरू करून मुलांचं स्वास्थ्य धोक्यात का घातलं जातंय? याचा विचार करणे गरजेचे आहे. जर मार्चमध्ये मुलांचे व्हॅक्सिनेशन होणार असेल तर २४ जानेवारीला शाळा सुरू करून काहीच साध्य होणार नाही.
'ही' मुलं बाधित होण्याची शक्यता
तसेच कोणतेही पालक आपल्या मुलांचं लसीकरण झाल्याशिवाय शाळेत पाठवण्यास नाही. जरी राज्य सरकार आणि शहराचे पालक अधिकारी असे निर्णय घेत असले तरी पुणे-मुंबई शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे आकडे चढ- उतार करत आहेत. संपूर्ण पुणे शहराचा आकडा जर आपण विचारात घेतला तर ४० हजार पेक्षा जास्त रुग्ण पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये सापडतील. केवळ शहरी भागात नाही तर ग्रामीण भागात देखील लहान मोठ्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला ( Covid Spread In Maharashtra ) आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवणं, हे त्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने धोक्याच आहे. जरी बाल रोग तज्ज्ञांच्या मते लहान मुलांना कोरोनाचा धोका हा कमी असला तरी काही लहान मुलांमध्ये जन्मजात काही आजार असतात. त्यामध्ये मधुमेह, हृदयविकार, स्थूलता अशा प्रकारचे अनेक रोग लहान मुलांना असतात. अशावेळी ही मुलं बाधित होऊ शकतात, असेही डॉक्टर भोंडवे म्हणाले.