महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Girish Bapat : पुणे विमानतळावरुन आणखी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करा; गिरीश बापटांची मागणी

खासदार गिरीश बापट ( mp Girish bapat ) यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहलं आहे. त्यामध्ये पुणे विमानतळावरून आणखी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली ( Start more international flights from Pune airport ) आहे.

Girish Bapat
Girish Bapat

By

Published : Jul 23, 2022, 5:28 PM IST

पुणे - खासदार गिरीश बापट ( mp Girish bapat ) यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहलं आहे. त्यामध्ये पुणे विमानतळावरून आणखी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली ( Start more international flights from Pune airport ) आहे. सिंगापूर, बँकॉक, पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिका येथे आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी लोकांकडून विनंत्या आल्या आहेत. सध्या शहराकडे फक्त एकच आंतरराष्ट्रीय विमान आहे जे पुणे ते दुबईला जोडते, असे पत्रात गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.

गिरीश बापट म्हणाले की, पुणे ही भारतातील आठव्या क्रमांकाची महानगरीय अर्थव्यवस्था मानली जाते. देशातील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न आहे. पुण्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उत्पादन, माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात.

खासदार गिरीश बापट यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला लिहलेले पत्र

लॉकडाऊनपूर्वी शहराच्या विमानतळावरून चारहून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होती. मात्र, ही संख्या केवळ एकावर आली आहे. ज्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रे असल्यामुळे पुण्याचे वर्णन 'पूर्वेचे ऑक्सफर्ड' म्हणून केलं जाते. हे शहर देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र बनले आहे, असे बापट यांनी म्हटलं.

दरम्यान, यापूर्वीही शहरातील अनेक उद्योजकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. शहर नवीन विमानतळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. कारण सध्याचे विमानतळ जिथे व्यावसायिक उड्डाणे चालवली जातात, ते भारतीय हवाई दलाचे आहे. नागरी ऑपरेशन्सवर अनेक निर्बंधांमुळे नवीन विमानतळ शहरासाठी प्रस्तावित करण्यात आले होते.

हेही वाचा -Sanjay Pawar : 'पैसा, पदांची ऑफर देत जिल्ह्या जिल्ह्यातील शिवसेना फोडण्याचे प्रयत्न'

ABOUT THE AUTHOR

...view details