महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मैत्रिणींना फिरवण्यासाठी स्पोर्टबाईक चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक, 20 स्पोर्टबाईक जप्त - सराईत चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली

मैत्रिणींना फिरवण्यासाठी स्पोर्टबाईक चोरणाऱ्या दोघा चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल 20 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. संतोष विष्णू नागरे आणि सागर शरद समगीर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Sports bike thieves arrest with 20 bikes
स्पोर्टबाईक चोरणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक

By

Published : Feb 10, 2020, 11:27 PM IST


पुणे - मैत्रिणींना फिरवण्यासाठी स्पोर्टबाईक चोरणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल 20 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. संतोष विष्णू नागरे आणि सागर शरद समगीर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुण्यात चांदीची गदा विकत घेण्यासाठी आले होते. वीर गावात यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत विजेत्या पैलवानांना ते देणार होते. दरम्यान सराईत वाहनचोर काळ्या रंगाची पल्सर गाडी घेऊन रविवार पेठेत आल्याची माहिती पोलीस कर्मचारी शंकर कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, त्यांनी 20 स्पोर्टबाईक चोरल्याचे कबुल केले. या सर्व बाईक त्यांनी वीर गावात एका गोठ्यात लपवून ठेवल्या होत्या. या सर्व मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

आरोपी संतोष हा मूळचा सिंदखेडराजा येथील रहिवासी आहे. मागील आठ वर्षांपासून तो पुण्यात राहतो. तर सागर हा पुरंदर तालुक्यातील वीर गावचा आहे. तो मोबाईल शॉपी चालवतो. एका मित्राच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी पाळत ठेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पोर्टबाईक चोरण्यास सुरवात केली. बनावट चावीच्या सहाय्याने ते या गाड्या चोरायचे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details