पुणे - रोटरी क्लब, नारायणगाव पोलीस स्टेशन आणि गुरुवर्य रा.प.सबनीस माजी विद्यार्थी संघ व्हॉलीबॉल संघाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाल्या. ग्रामीण भागात व्हॉलीबॉलला पत, प्रतिष्ठा आणि चालना मिळावी यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
ग्रामीण भागात व्हॉलीबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी नारायणगाव येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन - राज्यस्तरीय
ग्रामीण भागात व्हॉलीबॉलला पत, प्रतिष्ठा आणि चालना मिळावी यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मागील ११ वर्षांपासून विविध खेळांच्या स्पर्धा याठिकाणी खेळल्या जात आहेत. येथे झालेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेत पाथरे संघाने प्रथम क्रमांक पटकविला. राज्यभरातील 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नारायणगाव पोलीस ठाण्याच्या मैदानावर रात्रीच्या वेळी या स्पर्धा खेळल्या गेल्या. स्पर्धेचे उद्घाटन कृषिरत्न अनिल मेहेर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्या हस्ते झाले.
ग्रामिण भागात हॉलीबॉल खेळाच्या सुविधा उपलब्ध होत नसतात त्यामुळे या खेळाकडे नेहमीच दुर्लक्ष होते. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या तर व्हॉलीबॉल हा खेळ उत्तम पद्धतीने ग्रामिण भागात खेळला जावू शकतो.