महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सिंहगड एक्स्प्रेस आजपासून सुरू, गेली 20 महिन्यांपासून होती बंद - etv bharat maratahi

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. परंतु पुणे-मुंबई मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही रेल्वे सुरु करण्याची मागणी सातत्याने होत होती.

सिंहगड एक्स्प्रेस आजपासून सुरू, गेली 20 महिन्यांपासून होती बंद
सिंहगड एक्स्प्रेस आजपासून सुरू, गेली 20 महिन्यांपासून होती बंद

By

Published : Oct 18, 2021, 10:13 AM IST

पुणे - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. परंतु पुणे-मुंबई मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही रेल्वे सुरु करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर आज पासून पुणे-मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गेल्या 19 महिन्यापासून ही गाडी बंद होती.

सिंहगड एक्स्प्रेस आजपासून सुरू
प्रवाशांकडून समाधान व्यक्त

पुण्यावरुन ही रेल्वेगाडी सकाळी 6 वाजून 05 मिनिटांनी निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन ही गाडी (क्र. 01010) सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी निघेल. रात्री 10 वाजता पुणे स्टेशन येथे पोहचेल. ही रेल्वे गाडी पुन्हा सुरु केल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा -आर्यन खान प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details